फोंडशिरस परिसरातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सोज्वळ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचा वाढदिवसानिमित्त…..
फोंडशिरस ( बारामती झटका )
फोंडशिरस तालुका माळशिरस या गावाचे थोर सुपुत्र ॲड. धैर्यशील रामदास पाटील यांनी फोंडशिरस परिसरात राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारे सोज्वळ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस निमित्त अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या व माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पक्ष बदलाचे वारे वाहत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार संसद पटू खासदार सुप्रियाताई सुळे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ठाम राहून पक्षाची ध्येय धोरणे व सामाजिक कार्यात भरीव कार्य करून प्रख्यात विधीतज्ञ असणारे ॲड धैर्यशील रामदास पाटील यांनी पक्षनिष्ठा ठेवलेली आहे ॲड. धैर्यशील पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पद आहे सोलापूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कायम त्यांची धडपड सुरू असते विधीक्षेत्रामध्ये अनेक लोकांना सल्ला व माफक फी मध्ये सर्वसामान्य जनतेची कामे करीत असतात फंडशिरस पंचक्रोशी मध्ये कार्यातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ॲड धैर्यशील रामदास पाटील यांचा वाढदिवस 21/ 5 /20 23 रोजी असल्याने त्यांच्यावर कार्यकर्ते हितचिंतक मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле