चि. अभिषेक पांढरे पाटील, नातेपुते व चि. सौ. कां. विद्या कुलाळ, खुडूस यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न
निमंत्रक माजी सरपंच तथा नगरसेवक ॲड. रावसाहेब पांढरे पाटील आणि प्रेषक माजी उपसरपंच भीमराव पांढरे पाटील, कु. अधीरा पांढरे पाटील यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री. भीमराव अण्णा पांढरे पाटील यांचे नातू व नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. रावसाहेब भीमराव पांढरे पाटील रा. नातेपुते, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभिषेक आणि कै. आण्णा तुकाराम कुलाळ यांची नात व श्री. निवृत्ती आण्णा कुलाळ रा. खुडूस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. विद्या यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. १/६/२०२३ रोजी दुपारी १२ वा. २४ मि. या शुभ मुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. रावसाहेब भीमराव पांढरे पाटील आणि प्रेषक नातेपुते ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भीमराव आण्णा पांढरे पाटील व कु. अधिरा विराज पांढरे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पांढरे पाटील व कुलाळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng