सरपंच वीस हजार व ग्रामविकास अधिकारी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले..
पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन केलेल्या कामाचे बिल मंजूर केलेल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी.
ठाणे (बारामती झटका)
अँटी करप्शन ब्युरो परिक्षेत्र ठाण्याचे पोलीस अधीक्षक श्री. सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो ठाणे पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकाने गोठेघर, ता. शहापूर, जि. ठाणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी रुचिता भालचंद्र पिंगळे वय 26 वर्ष व ग्राम विकास अधिकारी श्री. दिलीप गोविंद इंगळे वय 51 वर्ष यांना लाच स्वीकारताना गोठेघर ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहात मंगळवार दि. 27/06/2023 रोजी दुपारी दोन वाजता पकडण्यात आलेले आहे. त्यांच्यावर लाच प्रतिबंधक कायद्यान्वये शहापूर पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
तक्रारदार यांनी गोठेघर ग्रामपंचायत हद्दीतील राईस मिल ते चिंतामणी प्लाझा दरम्यान पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन केलेल्या कामाचे बिल 1 लाख 23 हजार 175 रुपये मंजूर केल्याचा मोबदला म्हणून आरोपी क्रमांक 1 सरपंच कु. रुचिता भालचंद्र पिंपळे 20,000 रु. व आरोपी क्रमांक 2 ग्रामविकास अधिकारी दिलीप गोविंद इंगळे यांनी 5000 रु. अँटी करप्शन ब्युरो ठाणे युनिटने सापळ्याचे आयोजन करून वरील दोघांना तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहात पकडण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent article! I appreciate the thorough and thoughtful approach you took. For more details and related content, here’s a helpful link: LEARN MORE. Can’t wait to see the discussion unfold!
Excellent article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, I recommend this link: FIND OUT MORE. Keen to see what others think!
Hi! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my
website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
If you know of any please share. Kudos! I saw similar art here: Eco blankets