महायुतीचे पडसाद गाव गाड्यात उमटले, ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच असावेत मागणीने जोर धरला….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दोन उपमुख्यमंत्री झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था दोन उपसरपंचाची मागणी
पुणे( बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली असल्याने महाराष्ट्र राज्यात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे ट्रिपल इंजिन सरकार सुरू आहे याचे पडसाद आता गाव गाड्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन उपसरपंच असावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे.
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत च्या सरपंच अंकिता भुजबळ आणि उपसरपंच राहुल भुजबळ यांनी यासंदर्भात निवेदन लिहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng