लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे भाजपचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची मागणी.

माळशिरस तालुक्यातील जिल्हा मार्ग क्रमांक 213 शिंगोर्णी काळमवाडी कुसमोड मळोली शेंडेचींच धानोरे तोंडले बोडले ते दसुर रस्त्यात निधी मिळण्याची केली विनंती…
माळशिरस ( बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष व मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव यांनी माळशिरस तालुक्यातील जिल्हा मार्ग क्रमांक 213 शिंगोर्णी काळमवाडी कुसमोड मळोली शेंडेचींच धानोरे तोंडले बोंडले ते दसुर रस्त्यास निधी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे त्यावेळेस सुनीलआबा जाधव, धनाजीबापू जाधव, सत्यजित उर्फ पप्पू शिंदे, नितीन महाडिक यांनी निवेदन दिले यावेळेस अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या निवेदनामध्ये जिल्हा मार्ग रस्ता क्रमांक 213 शिंगोर्णी, काळमवाडी, कुसमोड, मळोली,शेंडेचींच, धानोरे, तोंडले, बोंडले ते दसुर रस्त्यास जिल्हाप्रमुख रस्त्याची मान्यता मिळाली आहे तरी सदरच्या रस्त्यावरून ऊस वाहतूक दळणवळण मोठ्या प्रमाणात होत आहे तरी रस्ता क्रमांक 213 हा रस्ता साधारण 26 किलोमीटर लांबीचा असून सदरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठे मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करण्यास नागरिकांना त्रास होत आहे तरी सदर रस्त्यास आपले स्तरावर प्रयत्न करून 30 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे निधी उपलब्ध करावा असे पत्रात नमूद केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng