बारामती येथील महाराष्ट्र प्रबोधिनी ॲकॅडमीच्या ७२ यशवंतांचा सन्मान सोहळा

बारामती (बारामती झटका)
पोलिस उपनिरीक्षक, राज्य विक्रीकर निरीक्षक, उपजिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, महसूल सहाय्यक, सहाय्यक अभियंता या विविध पदांवर नियुक्त झालेल्या महाराष्ट्र प्रबोधिनी ॲकॅडमी, बारामतीच्या यशवंतांचा सन्मान सोहळा बुधवार दि. १९/०७/२०२३ रोजी दु. ३.३० वा. मुक्ताई लॉन्स, सिटीइन चौक, एमआयडीसी, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे असणार आहेत. सदरर सन्मान सोहळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली तर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे आनंद भोईटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी दुपारी १२.३० वा. भव्य मिरवणूक सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राज्य पुरस्कार प्राप्त हलगी वादक व ढोल वादक हे असणार आहेत.
तरी या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी चे संचालक विजयराज चंदनकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng