चि. कल्पक देवकर, माळशिरस आणि चि. सौ. कां. स्नेहल पवार, सोलापूर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
प्रेषक श्री. बबनराव भगवान देवकर कलाध्यापक, गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस..
माळशिरस (बारामती झटका)
सौ. उज्वला उर्फ इशा व श्री. बबनराव भगवान देवकर रा. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव कल्पक देवकर आणि सौ. गिरीजा व श्री. सुनील रामचंद्र पवार यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. स्नेहल पवार यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 17/12/2023 रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटे या शुभ मुहूर्तावर “पुष्पस्नेह लॉन्स” अंत्रोळीकर नगर -१ जवळ, भाग्योदय सोसायटी नजीक, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. बबनराव भगवान देवकर कलाध्यापक गोपाळराव देव प्रशाला माळशिरस यांनी नम्र आवाहन केलेले आहे.
नवे ऋणानुबंध, नवीन नाती निर्माण करणारा असा एक मंगल सोहळा या शुभमंगल प्रसंगी आपणासारख्या आप्त जणांचा स्नेहपूर्ण सहवास असावा आणि नवदांपत्यास शुभ अशीर्वाद लाभावेत, यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण दिलेलेच आहे. मात्र लग्नाच्या घाई गडबडीत आपणास हस्ते परहस्ते आग्रहाचे निमंत्रण मिळो अथवा न मिळो हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे श्री. बबनराव देवकर व समस्त देवकर परिवार, माळशिरस यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.