ताज्या बातम्याराजकारण

अकलूज म्हटलं की विजयसिंह मोहिते पाटील अन्, माळशिरस म्हटलं की राम सातपुते आपोआप नाव चर्चेत येणार..

विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास पावलावरून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची विकास वाटेवरून विकासाची दमदार वाटचाल सुरू

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास पावलावरून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात अकलूज येथे सुसज्ज असे शासकीय विश्रामगृह विजयसिंह मोहिते पाटील यांनी उभारलेले आहे. माळशिरस येथे 03 कोटी 76 लाख रुपयाचे सुसज्ज शासकीय विश्रामगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. अकलूज म्हटलं की विजयसिंह मोहिते पाटील अन्, माळशिरस म्हटलं की राम सातपुते आपोआपच नाव चर्चेत येणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राजकीय कारकीर्दीत माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणलेली होती. सध्या माळशिरस विधानसभेचे प्रतिनिधित्व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते करीत आहेत. माळशिरस विधानसभेचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अडीच वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माळशिरस मतदारसंघात विकासाचा झरा सुरू होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम सुरू आहे.

माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना आमदार राम सातपुते यांनी सततचा पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावलेली आहेत‌. विकासाबरोबर माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच जनता दरबाराची संकल्पना सुरू झाली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपली कैफियत, अडचणी मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळाले.

गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची आरोग्य निधीमार्फत सर्व अवयवाची मोफत ऑपरेशन करून गोरगरिबांचे आरोग्यदूत आमदार झालेले आहेत. माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार सुरू असतो. सदरच्या ठिकाणी कितीतरी लोकांनी शासकीय विश्रामगृह आमदार राम सातपुते यांच्यामुळे पाहिलेले आहे.

माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह दोन सूटचे छोटेसे होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहासाठी भरीव निधी मंजूर केलेला आहे. सदरच्या विश्रामगृहाच्या कामाचे टेंडर झालेले आहे. सदर जागेची साफसफाई सुरू आहे. लवकरच माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहाचा भूमिपूजन होईल व सुसज्ज अशी वास्तु तयार होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button