कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार
महाबळेश्वर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच सर्व वयोगटासाठी मॅरेथॉनचे आयोजन दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आलेले आहे.
मॅरेथॉन स्पर्धेबरोबर विविध समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरवरची लस, एचपीव्ही वॅक्सिंग, ९ ते २० वयोगटातील १५० मुलींना मोफत लस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कशिश सोशल फाउंडेशन पुणे चे योगेश पवार यांच्या तर्फे ५०० ते १००० मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक सतीश ओंबळे महाबळेश्वर व दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्राप्त पिंक रेवोल्युशन च्या संस्थापिका डॉ. श्रद्धा गोंदकर – जवंजाळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
‘रन फॉर हेल्थ’ आणि ‘एलिमिनेशन ऑफ सर्वाइकल कॅन्सर फ्रॉम इंडिया’ ही ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रात काम सुरू आहे. त्याचबरोबर १५० मुलींना HPV वॅक्सीन गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून देण्यात येते. या लसीची किंमत 4000 रुपये इतकी आहे.
सर्व मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या मुले, मुली, महिला, पुरुष सर्वांना मेडल व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. दोन दिवस मोफत झुंबासेशन असणार आहे. सदर कार्यक्रमात डॉक्टर कविता कांबळे यांच्यामार्फत डायट व न्यूट्रिशन यावर मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात गतिमान विकासकामे करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन व विविध समाज उपयोगी सामाजिक उपक्रम कार्यक्रमास सर्व महाबळेश्वरकरांसह, पंचक्रोशीतील पाचगणी, वाई, तसेच सातारकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा व उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.