राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय ढेकळे यांची निवड…

करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे व सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांचे विश्वासू सहकारी उंबरे दहिगाव गावचे थोर सुपुत्र दत्तात्रय ढेकळे यांची निवड करण्यात आली.
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय ढेकळे यांची सोलापूर ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गोरड सर यांनी निवड केली. नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांच्या सत्कार सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. सुरेशआबा पालवे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष श्री. शिवाजीराव (आबा) देशमुख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग श्री. मच्छिंद्र गोरड (सर), लक्ष्मण रामचंद्र ठोंबरे माजी उपसरपंच, माळशिरस शहराध्यक्ष नानासाहेब चव्हाण, सोपान महादेव वाघमोडे, माजी चेअरमन शंकर लक्ष्मण वाघमोडे, ज्ञानदेव ढेकळे, विष्णू ठोंबरे, बापू ढेकळे, दीपक ढेकळे यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय ढेकळे यांचे उंबरे दहिगाव ता. माळशिरस, हे जन्मगाव आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या गावापासून राजकारणाला व समाजकारणाला सुरुवात केलेली आहे. उंबरे दहिगाव जिल्हा परिषद शाळा ढेकळे वस्ती, या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदावर कार्यरत असताना सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजयमामा यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण, संपूर्ण कंपाऊंड, झाडे व इतर सोयीसुविधा पूर्ण केल्या. गावच्या राजकारणात सक्रिय होऊन 2017 साली ग्रामपंचायत सदस्य पदावर चुलती यांना दोनशे मतांनी विजयी केलेले होते. त्यानंतर सन 2022 मध्ये बंधुराज दुसऱ्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आणून उपसरपंच पद प्रथम संधी मिळालेली होती. सन 2017 सालापासून आमदार संजयमामा शिंदे, सुरेशआबा पालवे पाटील यांच्या माध्यमातून गावात व तालुक्यात विकासाची कामे केलेली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांनी विश्वासाने पक्षाची तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. निश्चितपणे माळशिरस तालुक्यामध्ये खेड्यापाड्यात व वाड्यावत्यावर गावागावात अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचविणार असल्याचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे यांनी बारामती झटका प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.