देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेची जय्यत तयारी सुरू..

माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळ्या सुरू झालेल्या आहेत. देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 30/04/2024 रोजी माळशिरस शहरानजीक पुणे-पंढरपूर रोडवर, कृषी कार्यालयाच्या जवळ जाहीर सभेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. मैदानाची साफसफाई व स्वच्छता करण्याच्या कामाला गती आलेली आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माळशिरस येथील सभेच्या ठिकाणी भेट दिलेली होती. त्यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक, पंढरपूर पोलीस उपअधीक्षक, अकलूज पोलीस उप अधीक्षक, माळशिरस पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माळशिरस येथील जाहीर सभेचे ठिकाण, हेलिपॅड व पार्किंग, वाहतूक, इतर ठिकाणांची पाहणी केलेली आहे. यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा माळशिरस येथे होत आहे. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते व राज्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मोठ्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार आहे. सभेची जय्यत तयारी सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.