आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रदादा पाटील यांची कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

फलटण (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाच्या
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना. नरेंद्रदादा पाटील यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांचा भाजपच्यावतीने युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, मंडल अध्यक्ष अमोल सस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे, राजेंद्र निंबाळकर, अमोल लवळे, सिध्दीराज कदम, सनी कदम, डॉ. धनंजय आटोळे, वसंत कदम आदी उपस्थित होते.
सत्कारानंतर औपचारिक चर्चा करताना नामदार नरेंद्र दादा पाटील यांनी सांगितले की, फलटण तालुक्यात लवकरच युवा उद्योजकांना मार्गदर्शन व सुलभ कर्ज पुरवठा व बँकाना याबाबत सूचना देण्यात येतील. यासाठी लवकरच बैठक आयोजित करणार आहे, असे नरेंद्रदादा पाटील यांनी बोलताना सांगितले. तसेच यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.