मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील आठ रस्त्यांना कोट्यावधी रुपये निधी मंजूर…
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार कामगिरी..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील आठ रस्त्यांना कोट्यावधी रुपये निधी मंजूर करून दमदार कामगिरी केलेली आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीवर माळशिरस तालुक्यातील अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 02 संशोधन व विकास अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 42 रस्त्यांना राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रशांत विनायकराव पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील आठ रस्त्यांचा समावेश आहे.
वेळापूर ते म्हेत्रे मळा 3.700 किलोमीटरसाठी 554.71 लाख रु., एन एच 965 ते कोंडबावी रस्ता 4.7 00 किमी साठी 714.63 लाख रु., चाकोरे ते कुरण बंगला रस्ता 4.500 किलोमीटरसाठी 606.60 लाख रु., एन एच 965 जी यशवंत नगर ते गिरझणी रस्ता 4.100 किमी साठी 726.29 लाख रु., एन एच 965 जी ते वाफेगाव रस्ता 5.7 00 किमी साठी 999.96 लाख रु., एन एच 965 जी 25/ 4 ते वाघोली रस्ता 6.000 किमी साठी 1067.39 लाख रु., बडे खान सदाशिवनगर ते उंबरे रस्ता 7.600 किलोमीटर साठी 1171.67 लाख रु., इजिमा 179 ते खरातवस्ती -शिवामृत डेरी रस्ता 3.100 किमी साठी 455.84 लाख रु. असा कोट्यावधी रुपये निधी मंजूर करून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रस्त्यांच्या कामासाठी दमदार कामगिरी केलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Ndewo, achọrọ m ịmara ọnụahịa gị.