प्रा. डॉ. आर. एस. गायकवाड यांची प्राचार्यपदी नियुक्ती

सांगोला (बारामती झटका)
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एस. गायकवाड यांची दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा येथे प्राचार्यपदावर नियुक्ती झाली आहे.
प्रा. डॉ. आर. एस. गायकवाड हे १९९२ पासून डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे रसायनशात्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांची नुकतीच दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे.

त्याबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेचे अध्यक्ष युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख, संस्थेचे सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे व सर्व संचालक मंडळ तसेच डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोलाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी व सर्व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.