ताज्या बातम्या

“समर्थ निवास” या नवीन वास्तूची वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा आयोजन.

प्रेषक – श्री. संजय कांता देशमुख अध्यक्ष, माळशिरस तालुका पत्रकार संघ

तरंगफळ (बारामती झटका)

एक वीट श्रमाची, एक वीट कष्टाची, एक वीट आई-वडिलांच्या आशीर्वादाची, एक वीट बहिणीच्या प्रेमाची, आता पहावी एक वीट आपल्या सहकार्याची या संकल्पनेतून साकारलेल्या “समर्थ निवास” या नवीन वास्तूचे वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा बुधवार दि. 14/08/2024 रोजी सकाळी 09 ते 12 या वेळेत मु. पो. तरंगफळ (निमगाव- गारवड रोड), ता. माळशिरस जि. सोलापूर येथे करण्याचे योजलेले आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार तीर्थप्रसाद व भोजनास येण्याचे अगत्य करावे, असे आपले नम्र श्रीमती कुसुम, यमुना कांता देशमुख, सौ. सुवर्णा व श्री. संजय कांता देशमुख आणि समस्त देशमुख परिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

घाई गडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी हेच निमंत्रण समजून उपस्थित राहुन दुपारी एक वाजलेपासून आपल्या आगमनापर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन केलेले आहे. तरी आपण उपस्थित राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा, असे प्रेषक श्री. संजय कांता देशमुख अध्यक्ष, माळशिरस तालुका पत्रकार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful task

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button