ताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार व्हावे यासाठी सोलापुरातील सिद्धेश्वराला, साकडे.

सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. छायादेवी पालवे पाटील या उभयतांच्या शुभ हस्ते संकल्प महाअभिषेक संपन्न…

सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व राष्ट्रवादीचे नेते किसनराव जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले…

सोलापूर (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरास साकडे घालून संकल्प महाअभिषेक शनिवार दि. 17/08/2024 रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा बारामती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सुरेशआबा पालवे पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. छायादेवी सुरेशराव पालवे पाटील या उभयतांच्या शुभ हस्ते संकल्प महाअभिषेक करण्यात आला. यावेळी महासंकल्प आयोजक सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व ज्येष्ठ नेते किसनराव जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे, चार वेळा उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असणारे अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामदैवतांना महा संकल्प अभिषेक सुरू आहेत. गेल्या आठवड्यामध्ये श्रावणातील पहिल्या सोमवारी नातेपुते येथील गिरीजापती मंदिरात महासंकल्प अभिषेक करून शिंगणापूर येथे संकल्प पायीवारी करून शिखर शिंगणापूरच्या महादेवास महा अभिषेक करण्यात आलेला होता.

सदरच्या संकल्प पायीवारी यात्रेची सुरुवात विधान परिषदेचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी झेंडा फडकवून सुरुवात केलेली होती‌.

सदरच्या पायी वारी यात्रेत सुरेशआबा पालवे पाटील सौ. छायादेवी पालवे पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सौ. अर्चना शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष अक्षयभैया भांड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नातेपुते ते शिंगणापूर पायी चालत जाऊन संकल्प महा अभिषेक केलेला होता. यानंतर सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर व सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसनराव जाधव यांनी संकल्प महाअभिषेकाचे आयोजन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom