मारकडवाडी येथे आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार सचिन रणदिवे यांचा स्तुत्य उपक्रम

मारकडवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
मारकडवाडी (बारामती झटका)
मौजे मारकडवाडी ता. माळशिरस, येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा, मारकडवाडी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी साप्ताहिक माळशिरस पॅटर्न व जनसत्ता मराठी न्यूजचे संपादक व द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन रणदिवे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आला. शालेय साहित्यामध्ये वही, पेन, सचित्र बालमित्र अंकलपी, सीसपेन्सिल आदींचा समावेश होता.
याप्रसंगी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण भाऊ साठे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, माजी पंचायत समिती सदस्य अजयजी सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे ओबीसी सेल माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे बापूराव वाघमारे, पुरोगामी महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रमोदजी शिंदे, उपसंपादक प्रशांत खरात, फोंडशिरसचे उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांच्यासह मारकडवाडी गावचे सरपंच रणजीत मारकड, सोमेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन दत्तु भाऊ दडस, माजी सरपंच अमित वाघमोडे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब वाघमोडे-पाटील, प्रगतशील बागातदार विजय वाघमोडे, शेखलाल शेख, सर्जेराव लोखंडे, रामचंद्र मारकड, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिकेत अवघडे, मुख्याध्यापक साळुंखे सर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवघडे सर तर आभार प्रदर्शन मुंडे सर यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.