फडतरी येथे श्रीनाथ व श्री हनुमान भंडारानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान

फडतरी (बारामती झटका)
फडतरी ता. माळशिरस, येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्रीनाथ व श्री हनुमान भंडारानिमित्त श्रीनाथ व श्री हनुमान भंडारा समिती व समस्त ग्रामस्थ फडतरी यांच्यावतीने रविवार दि. १/९/२०२४ रोजी भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन फडतरी येथे करण्यात आले आहे.
या मैदानामध्ये कुस्त्या ठरविल्या जात नाहीत, तर मैदानातच लावल्या जातात, ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. या मैदानात शेवटची कुस्ती ही १ लाख रुपये इनामावर खेळली जाणार आहे. तरी राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व पैलवानांनी नोंद घेवून फडतरीच्या मैदानासाठी वेळेवर उपस्थित राहावे. त्यावेळी पैलवानांच्या कुस्त्या जोडल्या जातील. याचा सर्व पैलवानांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीनाथ व श्री हनुमान समिती व कुस्ती संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यामध्ये इनाम रुपये ५० रुपयांपासून ते १ लाख रुपये पर्यंतच्या कुस्त्या सकाळी ११ ते २ पर्यंत नेमल्या जातील. पैलवानांनी दुपारी २ वाजेपर्यंत हजर राहावे. दुपारी २ नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही. मैदानात एकही कुस्ती जोडली जाणार नाही. पंचाचा निर्णय अंतिम राहील. आयत्यावेळी बदल करण्याचा अधिकार पंच कमिटीस राहील. कुस्ती बरोबरीत सुटल्यास इनामाचा चौथा हिस्सा दिला जाईल, या सर्व गोष्टींची पैलवानांनी नोंद घ्यावी.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.