भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र दिले…
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जलनायक शिवराजभैय्या पुकळे यांनी भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी स्वप्निलकुमार राऊत तर उपाध्यक्षपदी ओंकार खराडे यांची निवड..
वेळापूर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विधानसभेच्या निवडणुकीत गाव भेट दरम्यान वेळापूर येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जलनायक शिवराजभैय्या पुकळे यांनी सरचिटणीस पदी युवा नेते स्वप्निलकुमार राऊत व जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार खराडे यांच्या निवडी जाहीर केल्या. नवनियुक्त सरचिटणीस व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या निवडीचे पत्र लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ज्येष्ठ नेते ॲड. डी. वाय. राऊत, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे प्रांतिक निमंत्रित सदस्य डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतबापू सुळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते मदनसिंह माने देशमुख, भाजपचे माळशिरस तालुका अध्यक्ष ॲड. शरद मदने, श्रीधर देशपांडे, स्वप्निलकुमार माने देशमुख, ओंकार आडत, अजित ताटे, संजू पनासे आदी मान्यवर व गावातील समस्त ग्रामस्थ, महिलावर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीनिशी काम करून पक्षाला भव्य आणि ऐतिहासिक यश मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सोलापुर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, आ. राजेंद्र (भाऊ) राऊत, आ. राम (भाऊ) सातपुते, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता युवामोर्चा सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा सरचिणीसपदी स्वप्निलकुमार बाळासाहेब राऊत व उपाध्यक्षपदी ओंकार खराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शिवराज भैय्या पुकळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.