अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे ॲड. रमेश दिनानाथ जोशी…
मंगळवेढा (बारामती झटका)
मंगळवेढा, जि. सोलापूर येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे ॲड. रमेश दिनानाथ जोशी यांचा जीवनपट थोडक्यात पाहूयात. ॲड. रमेश जोशी यांचे प्राथमिक शिक्षण मंगळवेढा नगरपालिका शाळेमध्ये झाले तर, माध्यमिक हायस्कूलसाठी आठवीला एक वर्ष तर सोलापूरला हरीभाई देवकरण प्रशालेमध्ये तर राहिलेले तीन वर्षे नववी ते अकरावी मॅट्रिक इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे पूर्ण केले. तसेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन कॉलेज सांगली १९७१ ते १९७५ येथे पूर्ण केले. त्यानंतर १९७५ ते १९७८ आय एल एस लॉ कॉलेज पुणे येथून वकील झाले.
कोरोना काळापासून वकिली कमी केली मात्र, समाजकारण चालू आहे. अनेक शैक्षणिक संस्था, चारिटेबल संस्था, सहकारी बँक यामध्ये ते विविध पदावर कार्यरत आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी असून राष्ट्र प्रथम या भावनेने त्यांचे लिखाण चालू असते. गेली बारा वर्षांपासून दर आठवड्याला एक लेख याप्रमाणे स्तंभलेखन करीत आहेत. आजपर्यंत विविध विषयांवर किमान पाचशे ते सहाशे लेख झाले असतील.
ॲड. रमेश जोशी यांना सार्वजनिक आणि सामाजिक कामाची आवड आहे. तसेच त्यांना माणसे जोडायला आवडतात. त्यामुळे त्यांच्याकडे ८५०० संपर्क नंबर असून ते किमान १५० ते २०० ग्रुप मध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांचे स्वतःचे ४० ब्रॉडकास्ट ग्रुप आहेत.
नुकतीच २२ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना ७० वर्षे पूर्ण झाली. त्यांची देवावरती अढळ श्रद्धा आहे त्यामुळे त्याच्या कृपेने ७० वर्षांमध्ये त्यांनी एकही इंजेक्शन घेतले नाही किंवा एकही गोळी नाही. बीपी नाही, शुगर नाही, कोणताही आजार नाही. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून सर्वजण विवाहित असून ते पुणेकर झाले आहेत. त्यांना नातवंडे देखील आहेत. ॲड. रमेश जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दोघेच गावी असतात.
ॲड. रमेश दिनानाथ जोशी, मंगळवेढा
मो.नं. ८२७५५०६०५०
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
great articlemonperatoto Terpercaya
Cebeci su kaçak tespiti Hızlı Ekip: Kocaman bir ekiple geldiler ve işlemi çok hızlı tamamladılar. https://anthonymartialclub.com/1731234926593526_2395