ताज्या बातम्याराजकारण

कॅबिनेट मंत्री जयाभाऊ गोरे सोलापूरचे पालकमंत्री होऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले…..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर जिल्ह्यातील विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार…

माळशिरस (बारामती झटका)

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये माण-खटावचे लोकप्रिय आमदार जयकुमार उर्फ जयाभाऊ गोरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर जिल्ह्यातील विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे होणार अशी महायुतीच्या व भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील सर्व आजी-माजी आमदार व पदाधिकारी यांची मनोमन इच्छा आहे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जया भाऊ गोरे हेच व्हावेत.

लोकसभेच्या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री जयाभाऊ गोरे यांना सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा अंदाज आलेला आहे. जयाभाऊ गोरे म्हणजे 5G रेंज आहे. खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्याला जया भाऊ सारखा पालकमंत्री होणे गरजेचे आहे, हीच गरज ओळखून राजकारणातील चाणक्य व विरोधकांचा कर्दनकाळ असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस सोलापूर जिल्ह्यातील विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याने जयाभाऊ गोरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित होणार, यात विरोधकांनी शंका घेऊ नये.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button