ताज्या बातम्यासामाजिक
बारामती येथे उप माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीबाबत आवाहन
बारामती (बारामती झटका)
उप माहिती कार्यालय बारामती येथील वृत्तपत्रांची व इतर किरकोळ जमा झालेली रद्दी विक्री करण्यासाठी स्थानिक खरेदीदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी आपली दरपत्रके ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात उप माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, पहिला मजला, इंदापूर रोड, बारामती – ४१३१०३ या पत्त्यावर पाठवावी. लिफाफ्यावर ‘रद्दीसाठी दरपत्रके’ असा स्पष्ट उल्लेख करावा. मुदतीनंतर आलेली दरपत्रके स्वीकारली जाणार नाहीत. दरपत्रके स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार उपमाहिती कार्यालयाकडे राहील, अशी माहिती उप माहिती कार्यालयाने दिली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.