जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदलीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली…

सोलापूर जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी…
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासक आहे. बँकेच्या संचालक मंडळाने अनियमित कर्ज वाटप केलेले असल्याने त्यांच्यावर एकीकडे कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सहकारामध्ये पदाधिकारी असतील तरच अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने काम करतात मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक यांचा बेकायदेशीर व मनमानी कारभार सुरू आहे. सीनियरिटी वगळून सीनियर बँक इन्स्पेक्टर एका आप्पाला केलेले असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरमाईचं शिंदळ तर, वराडाचं काय.., अशी अवस्था प्रशासक व अधिकाऱ्यांनी केलेली आहे. अशी बातमी प्रसारित झाल्यानंतर सोलापूर जिल्हा बँकेत खळबळ उडालेली होती. जिल्हा बँकेत सीनियरिटी वगळून वरिष्ठ बँक इन्स्पेक्टर नेमणूकीच्या पदावर नातेपुते शाखेत कार्यरत असणारे शाखा अधिकारी एस. एम. खंडागळे यांना पदोन्नती मिळून सीनियर बँक इन्स्पेक्टर माळशिरस अकलूज विभाग यांच्याकडे नियुक्तीने पदभार दिलेला आहे. जिल्हा बँकेच्या पदोन्नतीमध्ये 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर 68 कर्मचाऱ्यांच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अंतर्गत शाखेत बदल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे यांच्या स्वाक्षरीने झालेल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 68 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये माळशिरस तालुक्याअंतर्गत शाखांबरोबर तालुक्याच्या बाहेरसुद्धा माळशिरस तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. पदोन्नती व बदल्या 79 झालेल्या आहेत, त्यामध्ये अनेकजण खुश आहेत तर काही नाराज आहेत. खुशी आणि गम जिल्हा बँकेत पाहायला मिळत आहे.
पदोन्नती होऊन सुद्धा अनेक नाराज आहेत बदली झाल्याने अनेकांची गोची झालेली आहे. बँकेतील खातेदार यांच्याकडून जेवणावळी व हॉटेल पार्टी खाण्यामध्ये चढवलेले अधिकारी प्रमोशन मिळून सुद्धा आहे ह्याच ठिकाणी काम करीत आहे. तरी राजेंद्र शिंदे यांनी आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे. अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी. प्रमोशन होऊन सुद्धा प्रमोशन वर काम करत नसतील तर प्रमोशन रद्द करावे.
बदल्या झालेल्या असल्याने शेतकरी सभासद यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले होते. अनेकजण त्याच ठिकाणी कार्यरत असल्याने शेतकरी सभासद यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. लवकरच बदली झालेल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांची रवानगी करावी, या मागणीने जोर धरलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.