ताज्या बातम्यासामाजिक

उंबरे दहिगाव येथे सरगर परिवाराच्या वतीने सिद्धनाथाचा गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन

उंबरे द. (बारामती झटका)

उंबरे (दहिगाव), ता. माळशिरस येथे सरगर परिवाराच्या वतीने सिद्धनाथाचा गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. ११/०५/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. उंबरे (दहिगाव) नजिक फाटा क्र. २४, सरगर वस्ती येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. दत्तू राऊ सरगर, श्री. मारुती राऊ सरगर, श्री. हनुमंत दादा सरगर, श्री. पोपट राऊ सरगर, श्री. पांडुरंग राऊ सरगर, श्री. शिवाजी नाना सरगर, श्री. ज्ञानदेव नरहरी सरगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी पळशी येथील रोहित चव्हाण यांच्या गोंधळ पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

घाईगडबडीत जर कोणाला चुकून पत्रिका द्यायची राहून गेली असेल तर व्हाट्सअपला आलेली पत्रिका आमंत्रण समजुन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त सरगर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

https://youtu.be/d9GIlogKefA?si=eLWaHWQrBD_m7N2Z

Related Articles

Back to top button