चि. रोहन वायसे, डोंबाळवाडी व चि. सौ. कां. भाग्यश्री दोरड, बेटवाडी नवीन नगर यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. कांतीलाल वायसे, डोंबाळवाडी व श्री. नंदकुमार दोरड बेटवाडी नवीन नगर यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
डोंबाळवाडी (बारामती झटका)
सौ. रूपाली व श्री. कांतीलाल सदाशिव वायसे, रा. डोंबाळवाडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. रोहन (BE Civil) व सौ. पार्वती व श्री. नंदकुमार आप्पासो दोरड रा. बेटवाडी नवीन नगर, ता. दौंड, यांची सुकन्या चि. सौ. कां.श भाग्यश्री (D.Pharmacy) यांचा शाही शुभ विवाह सोहळा शुक्रवार दि. ०६/०६/२०२५ रोजी दुपारी २ वाजून १९ मिनिटे या शुभमुहूर्तावर औदुंबर लॉन्स मंगल कार्यालय, होलेमळा, पाटस-दौंड रोड, ता. दौंड, जि. पुणे येथे संपन्न होत आहे. तरी या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वायसे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वायसे परिवार व दोरड परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.