चाकोरे येथे धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

अकलूज (बारामती झटका)
धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त माळशिरस तालुक्यातील चाकोरे गावामध्ये प्रथमच, सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन एक ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज परिवर्तनकार युवा वर्गाचे लाडके मार्गदर्शक वसंत हंकारे यांचे रविवार दि.०८/०६/२०२५ रोजी सायं. ०७ वा. डीसीसी बँकेसमोर, चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
परिसरातील सर्वांनी आपल्या मुला-मुली व परिवारासहित उपस्थित राहून जागृतीपर व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, चाकोरे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.