चि. गणेश टेळे पाटील, माळशिरस व चि. सौ. कां. प्राजक्ता खताळ, बार्शी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक
श्री. धुळदेव टेळे
ए.सी.पी. कर्जत रायगड.
श्री. बाबासाहेब टेळे
तहसीलदार, नागपूर.
श्री. सुरेशभाऊ टेळे
नगरसेवक, माळशिरस नगरपंचायत
अध्यक्ष, मनसे माळशिरस तालुका.
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय तुळशीराम एकनाथ टेळे पाटील यांचे नातू व श्री. राजेंद्र तुळशीराम टेळे पाटील रा. ६१ फाटा, माळशिरस ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव गणेश आणि श्री. आण्णा व्यंकटराव खताळ यांची नात व श्री. राजू आण्णा खताळ, रा. ढोराळे, ता. बार्शी यांची सुकन्या चि. सौ. कां. प्राजक्ता यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. १६/०६/२०२५ रोजी दुपारी २ वा. ४४ मि. या शुभमुहूर्तावर ६१ फाटा, माळशिरस, अकलूज – माळशिरस रोड येथे भव्य दिव्य शामियाना मंडपात संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे प्रेषक ए.सी.पी. कर्जत रायगड श्री. धुळदेव टेळे, तहसीलदार नागपूर श्री. बाबासाहेब टेळे, माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. सुरेशभाऊ टेळे व समस्त टेळे परिवार, माळशिरस यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लक्ष्मीच्या पावलांनी, मेहंदीच्या हाताने! कुलदेवतेच्या साक्षीने! सप्तपदींच्या पवित्र बंधनाने! गृहस्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी टेळे पाटील व खताळ परिवारांचे अगत्याचे निमंत्रण. तरी आपण या शुभमंगल प्रसंगी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह उपस्थित राहावे, असे आपले नम्र सौ. साधना व श्री. धुळदेव ज्ञानेश्वर टेळे पाटील, सौ. मनीषा व श्री. राजेंद्र तुळशीराम टेळे पाटील, सौ. वैशाली व श्री दत्तात्रय तुळशीराम टेळे पाटील, सौ. आरती व श्री. बाबासाहेब ज्ञानेश्वर टेळे पाटील आणि समस्त टेळे पाटील परीवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
सदरच्या शाही शुभविवाह सोहळ्यास आ. उत्तमराव जानकर, मा. आ. रामभाऊ सातपुते, माजी सभापती इंदापूर विलास रामचंद्र वाघमोडे, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पै. डॉ. भैय्यासाहेब बंडगर आदी उपस्थित राहणार आहेत.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक, व्यापारी, ग्रामस्थ यांनी येण्याचे अगत्य करावे, असे रॉयल एंटरप्राइजेस माळशिरस, शिवकृपा ऑटोमोबाईल्स, रॉयल मोबाईल माळशिरस, राजनंदिनी बिअर बार, रॉयल कार डेकोरेटेड माळशिरस, श्री विठ्ठल मेडिकल रेडे, रॉयल कन्स्ट्रक्शन माळशिरस, श्रेया मेडिकल माळशिरस, श्रीशा एंटरप्राइजेस, श्री चैतन्य कॅफे, श्री विठ्ठल एंटरप्राइजेस, श्रीराम ऍग्रो सर्विसेस, श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर्स, श्री विठ्ठल मेडिकल, मोनाली ड्रेसेस, माळशिरस या सर्व फर्मच्या वतीने शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



