कोथरूड येथे श्री सरस्वती कराड रुग्णालयाचे उद्घाटन ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते होणार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीशजी महाजन, खा. मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न
कोथरूड (बारामती झटका)
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, भारत संचलित प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा श्री सरस्वती कराड रुग्णालयाचे उद्घाटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते सोमवार दि. २३/६/२०२५ रोजी सकाळी १०.३० वा. श्री सरस्वती कराड रुग्णालय, विश्वशांती गुरुकुल शाळेजवळ, पौड रोड कोथरूड पुणे येथे संपन्न होणार आहे.
माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खा. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सरस्वती कराड रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे, एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे विश्वस्त डॉ. वीरेंद्र घैसास, एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या सह व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड नागरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.