खंडाळी येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शिधावाटप…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत योद्धा फाउंडेशनचे अनिल उर्फ भैय्यासाहेब मोरे यांचा स्तुत्य उपक्रम…
खंडाळी (बारामती झटका)
साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 30/08/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला मोफत शिधावाटप योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती खंडाळी दत्तनगर यांनी कार्यक्रमाचे आयोजन अनिल उर्फ भैय्यासाहेब मोरे यांच्या विशेष सहकार्यातून स्तुत्य उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

तरी खंडाळी दत्तनगर परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे योद्धा फाउंडेशन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



