पालकमंत्री धर्मपत्नी सौ. सोनिया गोरे यांची नातेपुते येथील कोहिनूर ब्युटी पार्लरला सदिच्छा भेट….

सौ. शैला गोरे – राऊत यांनी लग्नानंतर प्रशिक्षण घेऊन स्वतःचा पार्लर व्यवसाय उभा करून समाजात आदर्श निर्माण केला…
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या धर्मपत्नी श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी नातेपुते येथील सौ. शैला गोरे – राऊत यांच्या कोहिनूर ब्युटी पार्लरला मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. ऋतुजाताई शरदराव मोरे, फोंडशिरस गावच्या भावी सरपंच सौ. मयुरी मोघे – शेंडे, यशस्वी उद्योजक तानाजी किसन राऊत आदी उपस्थित होते.

फोंडशिरस गावचे सुसंस्कृत व सोज्वळ व्यक्तिमत्व महाराष्ट्र चॅम्पियन पै. विष्णूअण्णा गोरे यांची कन्या भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल ओबीसी अध्यक्ष सुनीलजी गोरे यांच्या भगिनी शैला गोरे यांचा सदाशिवनगर येथील तानाजी किसन राऊत यांच्याशी दि. 02/02/2002 रोजी विवाह झालेला होता. तानाजी राऊत यांचा सदाशिवनगर येथे सुमधुर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा व्यवसाय आहे. आपले पती यशस्वी उद्योजक आहेत. आपण सुद्धा कोणतातरी व्यवसाय करावा या दृष्टीने सौ. शैला गोरे – राऊत यांनी विवाहानंतर बारामती येथील जाधव मॅडम यांच्याकडे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पूर्ण केले. नातेपुते येथे दहिगाव रोड, प्रशांत गांधी हॉस्पिटलच्या शेजारी, कोहिनूर ब्युटी पार्लर व्यवसायास सुरुवात केली. त्या सध्या 19 वर्ष ब्युटी पार्लरचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. ब्युटी पार्लरला सौ. सोनिया गोरे यांनी सदिच्छा भेट द्यावी, अशी शैला गोरे – राऊत यांची मनोमन इच्छा होती. दहिगाव येथे जैन समाजाचा रथोत्सव मोठ्या प्रमाणात असतो. या कार्यक्रमासाठी सौ. सोनिया गोरे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. दहिगाव येथील कार्यक्रम आटोपून कोहिनूर ब्युटी पार्लरला सदिच्छा भेट दिलेली आहे.
सौ. सोनिया गोरे व सौ. ऋतुजाताई मोरे यांचा सन्मान सौ. शैला गोरे – राऊत यांनी केलेला आहे.
ब्युटी पार्लर दुकानाची रचना, ठेवण, स्वच्छता व टापटीप पाहून सौ. सोनिया गोरे यांनी समाधान व्यक्त केले. सौ. सोनिया गोरे यांनी सदिच्छा भेट दिल्याने गोरे फोंडशिरस व राऊत सदाशिवनगर दोन्ही परिवारांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



