सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपच्या विजयी सदस्यांचा भव्य सत्कार संपन्न

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर येथे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या 59 पैकी 38 विजयी जिल्हा परिषद सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ नेते ना. राजन (मालक) पाटील, मा. आ. यशवंत (तात्या) माने साहेब, आ. सचिनजी कल्याणशेट्टी, आ. समाधानदादा अवताडे, आ. देवेंद्र कोठे, मा. आ. राजेंद्रजी राऊत, मा. आ. रामभाऊ सातपुते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे, जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण, शिवाजी (सर) सावंत, प्रणवदादा परिचारक, मनिषभैय्या देशमुख तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



