विद्यार्थी काँग्रेसच्या राज्य महासचिव पदी ॲड. कृष्णा साठे यांची निवड

निमगाव (बारामती झटका)
काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआय (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) अर्थात विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी ॲड. कृष्णा साठे यांची निवड करण्यात आली आहे.
थेट जनतेतून निवडून आलेले निमगावचे (ता. माळशिरस) सरपंच सुभाष रामचंद्र साठे यांचे ते चिरंजीव आहेत. घरातून फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही कृष्णा साठे यांनी राजकारणात चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवले आहे.
ॲड. साठे हे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरात विद्यार्थी चळवळीत सातत्याने आणि सक्रियपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षणाशी संबंधित प्रश्न, परीक्षा, फी वाढ, वसतिगृह, शिष्यवृत्ती, तसेच अन्य मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.
विद्यार्थी प्रश्नांवर अनेक आंदोलने केली व प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी एनएसयुआय पुणे शहर व जिल्हा महासचिव म्हणून जबाबदारी पाहिली आहे. तसेच, पालघर जिल्हा एनएसयुआय प्रभारी म्हणून त्यांनी संघटनात्मक बांधणी करत विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचे काम केले आहे. राज्य महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात एनएसयुआयच्या माध्यमातून तीव्र संघर्ष केला जाईल. काँग्रेस पक्षाची विचारधारा, संविधानिक मूल्ये, समता, न्याय व लोकशाहीचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ताकदीने व निष्ठेने काम करत राहीन. – ॲड. कृष्णा साठे महासचिव, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



