देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुखी आहोत – माजी पालकमंत्री आ. विजयमालक देशमुख

भारतीय सैनिकांच्या मनामध्ये भारतमातेची सेवा करण्याची भावना असते – माजी आमदार राम सातपुते…
सरगरवाडी, कण्हेर गावचे थोर सुपुत्र व भारतमातेचे भूमिपुत्र श्री. लक्ष्मण सरगर भारतीय सेना इंडियन आर्मीमधून सेवानिवृत्त सत्कार समारंभ…
कण्हेर (बारामती झटका)
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे, त्यांच्या आहुतीमुळे आज आपण सुखी आहोत. लक्ष्मण सरगर यांनी केलेली 24 वर्ष सेवा खरंच खूप मोठी आहे. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात सेवा करण्याची हिंमत त्यांनी दाखवली म्हणून त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आपल्या रक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो सैनिक सिमेवर लढत आहे. लक्ष्मणजी सरगर 24 वर्षे देशसेवा करून परत आपल्या कुटुंबात परतले आहेत. इथून पुढेही ते अशीच सेवा करत राहतील, असा विश्वास सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयमालक देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील सरगरवाडी, कण्हेर गावचे थोर सुपुत्र व भारतमातेचे भूमिपुत्र श्री. लक्ष्मण महादेव सरगर भारतीय सेना इंडियन आर्मीमधून सेवानिवृत्त सत्कार समारंभात बोलताना सांगितले…



यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सौ. संजीवनी ताई पाटील, पिलीव जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत जाधव, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतबापू सुळ, खंडकरी शेतकरी नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपचे युवा नेते अतुलजी सरतापे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेळके, सौ. नम्रता पुकळे, आनंद शेंडगे सर, बाबासाहेब माने, माजी पंचायत समिती सदस्य बबनबापू पालवे, कण्हेर गावचे लोकनियुक्त सरपंच बाजीराव माने, युवा नेते धर्मराज माने, रमेश पाटील, महादेव कोळेकर, आकाश सावंत, राहुल पद्ममन, संजय देशमुख, महादेव केसकर, ॲड. राहुल लवटे, सीताराम झंजे, डॉ. लक्ष्मण गोरड, डॉ. मच्छिंद्र गोरड, अजय गोरड, महादेव कावळे, निलेश ननवरे, प्रमोद चिकणे, बाबुराव खिलारे, संभाजी माने, शंकर वाघमोडे, पोपट माने, भरत माने, उपअभियंता गोविंद कर्णवर पाटील, पोपट काळे आदींसह कण्हेर पंचक्रोशीतील मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की, भारतीय सैनिकांच्या मनामध्ये भारतमातेची सेवा करण्याची भावना असते आणि ते भारतमातेची सेवा करतात. सेवानिवृत्त लक्ष्मण सरगर यांनी जशी आतापर्यंत सेवा केली तशीच इथून पुढेही सेवा करत राहोत. सरगर परिवारातील दोन-तीन पिढ्या भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. बाळासाहेब सरगर यांना योग्य वेळी न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी नक्की करेल. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना कधीही अधिकाराने फोन केला तर ते नेहमी उपस्थित असतात. कार्यकर्त्यांना ताकद देतात. या तालुक्यामध्ये दोन शक्ती एकत्र येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने काम करून भरपूर मते मिळवली. 30-35 वर्षांपासून तुम्ही भारतीय जनता पार्टी तालुक्यात वाढवण्याचे काम करत आहात. आपल्याच पावलावर पाऊल ठेवून तालुक्यात अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला अपेक्षित असेल असेच कार्यकर्ते काम करतील. माजी नगरसेविका संजीवनीताई पाटील यांनी तालुक्यामध्ये भाजप वाढवण्यासाठी जे कष्ट घेतले आज त्या कष्टाला फळ येताना दिसतंय. त्यामुळे भविष्यात अजून ताकतीने आम्ही काम करू. असा विश्वास व्यक्त करत लक्ष्मण सरगर यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हातून समर्पित भावनेने समाजाची सेवा घडावी अशी कण्हेरसिद्ध चरणी प्रार्थना केली.
यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला. तसेच डीवायएसपी प्रदीप गोरड व कर आयुक्तपदी दिपाली खरात यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतमाता व मेजर लक्ष्मण सरगर यांच्या मातोश्री केशरबाई सरगर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. व सोमनाथ रुपनवर व संदीप शिंदे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले. छायाचित्रण शशिकांत म्हमाने माळशिरस यांनी केले तर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी केलेले होते…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



