ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मळोली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा सौ. पूनमताई जाधव – इंगवले गावच्या कन्येने रोवला….

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी नूतन सभापती पुनमताई इंगवले यांचा प्रचिती गड मुंबई येथे सन्मान केला.

सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या विजयाची पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार…

मळोली (बारामती झटका)

मळोली, ता. माळशिरस गावची कन्या सौ. पूनमताई जाधव इंगवले सांगोला पंचायत समितीच्या सभापती पदावर विराजमान झाल्याने मळोली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा सौ. पुनमताई जाधव इंगवले या कन्येने रोवलेला आहे. सांगोला पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा सभापती पदावर विजयाची पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सभापती सौ. पुनमताई इंगवले यांचा मुंबई येथील शासकीय निवासस्थान प्रचितीगड येथे सन्मान केला. यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत, युवा उद्योजक बाळासाहेब एरंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…

मळोली गावातील सधन शेतकरी कुटुंब असणारे सौ. आशाताई व श्री. हनुमंतराव श्रीमंत जाधव यांना पुनम मुलगी व ज्ञानेश्वर व अभिजीत दोन मुले आहेत. पुनम यांचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळोली, पाचवी ते दहावी जनता विद्यालय मळोली, अकरावी व बारावी सायन्स शारदा नगर माळेगाव बारामती येथे झालेले आहे. डी. फार्मसी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, अकलूज येथे पूर्ण केलेले आहे. मेडशिंगी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय विनायकराव नारायणराव इंगवले व श्रीमती उर्मिला विनायकराव इंगवले त्यांच्या घराण्यातील सुदर्शन इंगवले यांच्याशी दि. 19/11/2009 साली विवाह झालेला आहे. मेडशिंगीचे इंगवले व मळोली चे जाधव दोन्हीही सुसंस्कृत व उच्चशिक्षित घराणे आहेत. सुदर्शन खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी व उत्कृष्ट प्रगतशील बागायतदार असून मेडशिंगी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत. त्यांचे बंधू उल्हास विनायक इंगवले अन्नभेसळ प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सौ. सुप्रिया उल्हास इंगवले उत्कृष्ट गृहिणी आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या निवडणुकीत सौ. पूनमताई सुदर्शन इंगवले यांनी दैदीप्यमान यश संपादन केलेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला होता. पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या सांगोला पंचायत समितीवर सभापती पदाचा मान मळोली गावची कन्या व मेडशिंगी गावची सून सौ. पूनम सुदर्शन इंगवले यांना सभापतीपदाचा मान मिळालेला असल्याने मळोली व मेडशिंगी गावामध्ये समाधानाचे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सांगोला पंचायत समिती नूतन सभापती सौ. पूनम सुदर्शन इंगवले व उपसभापती श्री. अजय उत्तम सरगर यांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दि. 19 मार्च 2026 रोजी दुपारी एक वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button