ताज्या बातम्यासामाजिक

कार्तिकेयन एस. सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी; कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे पत्र सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले.

तब्बल पावणेतीन वर्ष सोलापूरचे कामकाज पाहताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात सेवा बजावली आहे. आषाढीवारी यशस्वी करताना सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न सोडवून विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर आयटी पार्कसाठीही त्यांनी झोकून देऊन काम केले. यांसह प्रशासनामध्ये शिस्त लावली. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे.

कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे.

कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button