जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत जाधव यांच्या शुभहस्ते गाढवे वस्ती येथे सिंगल फ्युज शुभारंभ..

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे चंद्रकांत जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्याचे फलीत झाले, गाढवे वस्ती उजेडात आली..
मळोली (बारामती झटका)
पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या शुभ हस्ते गाढवे वस्ती येथे सिंगल फ्युज उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक शिवाजीबापू जाधव, शिवशंकर सोसायटीचे चेअरमन व मळोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अरुण पवार, विशेष कार्यकारी अधिकारी तथा मळोली ग्रामपंचायतीचे सदस्य भीमराव मोरे, प्रगतशील बागायतदार राजाराम घोरपडे, युवा नेते दादा माने, लाभार्थी महादेव तुकाराम गाढवे, समाधान महादेव गाढवे आदी उपस्थित होते..

गाढवे वस्ती या ठिकाणी अनेक दिवसांपासून सिंगल फेज कनेक्शनपासून वंचित होते. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्याकडे श्री. चंद्रकांत जाधव यांनी सततचा पाठपुरावा महावितरणकडे केलेला होता. शासनाची न्यू कनेक्शन कंजूमर स्कीम मधून गाढवे वस्ती येथील लाईटचा प्रश्न निकाली निघालेला आहे.

अनेक दिवस अंधारात असलेली गाढवे वस्ती चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकाराने उजेडात आलेली आहे. लाईटच्या उजेडात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांचा महादेव तुकाराम गाढवे, सौ. सुनीता महादेव गाढवे, प्रकाश महादेव गाढवे, समाधान महादेव गाढवे, चि. आर्यन प्रकाश गाढवे, कु. सोनाली प्रकाश गाढवे परिवारांच्या वतीने सन्मान करण्यात आला…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



