शिवसेना ओबीसी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष पदी श्री. सुमितभाऊ जानकर यांची नियुक्ती…

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा ना. एकनाथरावजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा शिवसेना विधिमंडळ उपनेते नामदार भरतशेठ गोगावले साहेब, यांच्या सहमतीने शिवसेना ओबीसी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे साहेब यांनी श्री. सुमितभाऊ जानकर यांची शिवसेना ओबीसी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण पश्चिममध्ये माळशिरस, पंढरपूर, माढा, सांगोला, करमाळा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे

माळशिरस नगरपंचायत हद्दीत माळशिरस तालुक्यात श्री. सुमितभाऊ जानकर यांचा अनेक सामाजिक कार्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला कायम मदतीचा हात राहिलेला आहे. गणेश उत्सव काळामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम ठेवून परिसरातील जनतेला सहकार्याची भावना ठेवलेली आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून मोठी फळी निर्माण करून माळशिरस मधील 5 गणेशोत्सव मंडळ पहिल्यांदाच एकत्र करून वारकरी संप्रदाय पद्धतीने भव्य मिरवणूक काढली गेली. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये गरजू लोकांना फराळाचे वाटप केले जाते. आषाढी वारीच्या वेळेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा माळशिरस शहरांमध्ये मुक्कामी असतो. अशावेळी वारकरी व भाविकभक्तांना अन्नदान, पाणी वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून भाविकभक्तांचा आशीर्वाद मिळालेला असल्याने शिवसेना ओबीसी जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे.
लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने दिलेली जबाबदारी सुमितभाऊ यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन सुमितभाऊ राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असतात.
महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी नूतन जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ जानकर यांचा सन्मान करून भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुमितभाऊ जानकर यांचा मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य, सामाजिक व राजकीय कार्याची आवड यामुळे भविष्यात ओबीसी जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा शिवसैनिक व सुमितभाऊ जानकर यांचे मित्रपरिवार यांच्यामधून विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हाध्यक्ष पदावर सुमितभाऊ जानकर यांची नियुक्ती होताच निष्ठावान शिवसैनिक व समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



