न्यायाधीश गणी नदाफ यांना पीएचडी पदवी प्रदान

सोलापूर (बारामती झटका)
कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील न्यायाधीश गणी नदाफ यांना नुकतीच भारती विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. मुस्लिम महिलांशी संबंधित तलाकविषयक कायदे आणि त्यांचा पोटगीवर होणारा परिणाम – एक चिकित्सक अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
गणी नदाफ यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत उच्च पद गाठत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातून संघर्ष करत त्यांनी न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी विटा व कडेगाव येथे वकिली व्यवसाय केला. त्याआधी भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सातारा, नागपूर, माळशिरस आणि अमरावती येथे न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र. कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, प्राचार्य डॉ. शशिकांत हजारे तसेच डॉ. अनिसा शेख यांनी अभिनंदन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



