ताज्या बातम्याराजकारण
महायुतीचे उमेदवार श्री. विक्रम काकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे (बारामती झटका)
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-महायुतीचे उमेदवार म्हणून श्री. विक्रम काकडे यांनी आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.
यावेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, जेष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील, महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, श्री. जय पवार आदी उपस्थित होते.
पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता महायुतीचे उमेदवार म्हणून श्री. विक्रम काकडे हे बहुमताने विजयी होतील, हा विश्वास आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



