अनुदानित बियाणे वितरणासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

बारामती (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अन्नधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांच्या उत्पादन वाढीसाठी नवीन व अधिक उत्पादनक्षम वाणांच्या प्रसारासाठी खरीप हंगामात ‘प्रमाणित बियाणे पुरवठा’ हा घटक राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत बारामती तालुक्यात तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल व भुईमूग या पिकांचे अनुदानित दरात बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अथवा जवळच्या महा-ई-सेवा/सुविधा केंद्रामार्फत तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत. बियाणे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार असून अर्जासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



