भाजप वेळापूर शहर अध्यक्षपदी श्री. संदीप माने देशमुख यांची नियुक्ती…

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर शहरात भाजपचे कमळ फुलणार…
वेळापूर (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी युवा नेते श्री. संदीप माने देशमुख उर्फ तात्या यांची भारतीय जनता पार्टीच्या वेळापूर शहर अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिलेले आहे. त्यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, जयराज पतसंस्थेचे चेअरमन श्री. शशिकांत माने पाटील, भाजपचे निष्ठावान व ज्येष्ठ नेते ॲड. संजय दोशी भांबुडकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा इंद्रनील उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. विक्रमसिंह माने देशमुख, वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भाजपचे युवा नेते अमरसिंह माने देशमुख आदी उपस्थित होते…
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात वेळापूर मोठे शहर आहे. वेळापूर गावात गेली वीस वर्ष संदीपतात्या माने देशमुख राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. युवकांचे मोठे संघटन आहे. याचा प्रत्यय पंचायत समिती निवडणुकीमध्ये अनुभव आलेला आहे. संदीपतात्या यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे कमळ निश्चितपणे भविष्यात खुलणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. संदीपतात्या यांच्या निवडीने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले असून तात्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



