नुजहत परवीन आमीर मोहोळकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

अकलूज (बारामती झटका)
अकलूज एक्सप्रेस या युट्यूब चॅनल चे संपादक आणि दैनिक लोकसह्याद्री चे शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्या पत्नी नुजहत परवीन आमीर (मोहोळकर) यांचे 6 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, दोन दिर, सासू, जावई आणि नात असा मोठा बागवान-मोहोळकर परिवार आहे.
नूजहत परवीन या दिवंगत पत्रकार युसुफ मोहोळकर यांच्या सून तर ‘अकलूज एक्सप्रेस’चे संपादक आणि ‘दैनिक लोक सह्याद्री’चे अकलूज शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने मोहोळकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अकलूज परिसरातील पत्रकारिता क्षेत्रासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. नुजहत परवीन यांच्या पार्थिवावर शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला…
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच दिग्गज व्यक्तींनी मोहोळकर परिवाराचे सांत्वन केले. विविध क्षेत्रांतील नामवंतांनी उपस्थित राहून दिवंगत नुजहत परवीन आमीर बागवान (मोहोळकर) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



