मा. आ. राजाभाऊ राऊत यांची मामासाहेब पांढरे परिवारांची सांत्वनपर भेट घेतली…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांच्या मातोश्री स्व. सौ. लक्ष्मी पांढरे यांचे दुःखद निधन…
नातेपुते (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. लक्ष्मी पांढरे यांचे दुःखद निधन झालेले आहे. पांढरे परिवार यांची सांत्वनपर भेट माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता आवर्जून नातेपुते पांढरे वस्ती येथे मामासाहेब पांढरे यांच्या लक्ष्मीनारायण निवासस्थानी सांत्वनपर सदिच्छा भेट दिली.

यावेळी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख, तालुका संघटक डॉ. निलेश ननवरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



