कौठळीत ‘देहात’च्या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मका वाणांची चर्चा

इंदापूर (बारामती झटका)
कौठळी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे नुकताच ‘देहात’ कंपनीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कंपनीच्या उच्च उत्पादनक्षम मका वाणांचे प्रदर्शन करण्यात आले असून, परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी या उपक्रमाला मोठी पसंती दिली आहे.
मका वाणांचे आकर्षण
मेळाव्यात देहातच्या DMH-4041, DMH-4051, DMH-4059 आणि मुरघास स्पेशल 9519 या मका वाणांचे सादरीकरण करण्यात आले. लांब कणसे, टोकापर्यंत भरलेले दाणे, 85% शेलिंग टक्केवारी, कणसात 16-18 ओळी, प्रत्येक ओळीत 40-42 दाणे, काढणी पर्यंत हिरवेगार पिक आणि उत्तम गुणवत्ता पाहून शेतकरी प्रभावित झाले. यासोबतच पिकांची वाढ व दर्जा सुधारण्यासाठी ‘पॉलीमिक्स’ आणि ‘बूस्टमास्टर’ या उत्पादनांचा वापर कसा करावा, याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

तज्ञाचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून देहातचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. विशाल राजेभोसले आणि एरिया बिझनेस मॅनेजर श्री. चेतन जाधव उपस्थित होते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, मका पिकाचे विक्रमी उत्पादन आणि बाजारपेठेतील संधी याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.


मेळाव्याचे यशस्वी आयोजन
गोदाई अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक नितीन मारकड व सचिन मारकड यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात गुणवंत मरकड, हमा पाटील, नाना राऊत, अभिमान पावले, राहुल मारकड, सचिन घोडके आणि बापू खांडेकर यांच्यासह शेकडो प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

प्रदीप तुपे (देहात प्रतिनिधी, बारामती) यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. “जास्त उत्पादन, जास्त नफा” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, या मेळाव्याच्या निमित्ताने देहात कंपनीने मका उत्पादन क्षेत्रात आपली विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



