गणेश भोंग यांची बोरगाव केंद्रशाळा येथे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती

खंडाळी (बारामती झटका)
गणेश भोंग यांची बोरगाव केंद्र शाळा येथे नव्याने केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात सन २०१० मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अतिदुर्गम आहुपे गावातील बालविरवाडी प्राथमिक शाळेत केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, शैक्षणिक नवकल्पना आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांची माळशिरस तालुक्यात बदली झाली.
विरपुरी व वाडीबंगला या शाळांमध्ये कार्यरत राहिले. या काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विविध उपक्रम राबविणे, डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर, पालक सहभाग वाढविणे तसेच शाळेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विभागीय स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सहकारी शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, मित्रपरिवार, ग्रामस्थ व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, बोरगाव, ता. माळशिरस येथे त्यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नव्या जबाबदारीतही ते शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या सत्काराप्रसंगी बोरगाव केंद्र शाळेचे मुख्याध्यापक व प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणारे विजयकुमार देशमुख, सुनील वाघ, गणेश गोडसे, अनिल साने, सुहास रसाळ, प्रवीण शितोळे, धर्मा भाऊ खाडे, हनुमंत लोहार, किरण डोंगरे, मनोहर एकतपुरे, अवघडे सर, बारमते सर उपस्थित होते.
शरद भोसले सर, खंडाळी
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



