ताज्या बातम्यासामाजिक

युवा कीर्तनकार ह. भ. प. रमेश महाराज लांडगे यांचे सुश्राव्य कीर्तन कचरेवाडी येथे होणार

कै. नारायण राऊत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

कचरेवाडी (बारामती झटका)

कै. नारायण सोपान राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. ४/८/२०२६ रोजी राऊत वस्ती, (लाईट बोर्ड शेजारी), कचरेवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी पुण्यस्मरणानिमित्त युवा कीर्तनकार ह. भ. प. रमेश महाराज लांडगे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन चि. राहुल नारायण राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त राऊत परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button