ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील यांच्या शुभहस्ते विधान परिषद आमदार राजाभाऊ राऊत यांचा सन्मान सोहळा….

सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीने ॲड. ह‌. भ. प. जयवंत बोधले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार….

बार्शी (बारामती झटका)

महाराष्ट्र विधान परिषद सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मराठा भूषण आ. श्री. राजाभाऊ राऊत यांचा भव्य सत्कार समारंभ सोमवार दि. 10/08/2026 रोजी सायंकाळी 06 वाजता मराठा मंदिर छत्रपती कॉलनी, कुर्डूवाडी रोड, बार्शी येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई अध्यक्ष श्री. नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते तर ॲड. ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे, मराठा महासंघ नेते श्री. दास शेळके, सोलापूर माजी उपमहापौर श्री. दिलीप कोल्हे, मराठा महासंघ नेते श्री. सुनील रसाळे, शंभूराजे युवा क्रांती संघटना प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील (बप्पा) मोरे, मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी सर्व मराठा समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार भव्य सत्कार समारंभास उपस्थित राहावे असे सकल मराठा समाज बार्शी तालुका यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button