ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी अनिल घेरडे

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी अनिल चंदू घेरडे यांची पुन्हा एकदा निवड झाली. माळशिरस येथील महसूल भवनमध्ये बुधवारी (दि. १९) झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीने ही निवड करण्यात आली. सदस्यांनी घेरडे यांना सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी दिली आहे.

तलाठी संघाच्या एकूण ७९ सदस्यांपैकी ६७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अनिल घेरडे यांना ४० मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश शामराव भानवसे यांना १७, तर प्रकाश शिवाजी भोसले यांना १० मते मिळाली. त्यामुळे २३ मतांच्या फरकाने अनिल घेरडे विजयी झाले.

अनिल घेरडे हे यापूर्वी एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२६ या पंचवार्षिक कालावधीत संघाचे अध्यक्ष होते. त्यांची मुदत एप्रिलमध्ये संपल्यानंतर नवीन निवडणूक होईपर्यंत त्यांनी काळजीवाहू अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता झालेल्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवत त्यांनी अध्यक्षपद कायम राखले आहे. संघटनेतील इतर पदे अध्यक्षांच्या संमतीने बिनविरोध निवडली जाणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयकुमार जाधव, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप चव्हाण यांनी काम पाहिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button