ताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री ना. श्री. दत्तामामा भरणे यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर…

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या निमंत्रणावरून तालुका दौरा….

मोरोची (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. दत्तामामा भरणे यांचा शनिवार दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका दौरा जाहीर झालेला आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते किशोर भैय्या सुळ पाटील यांच्या निमंत्रणावरून माळशिरस तालुका दौरा विशेष कार्यअधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी जाहीर केलेला आहे…

सकाळी आठ वाजता अवंती रेसिडेन्सी, ए बी आय एल टिळक रोड, पुणे येथून भिगवन, ता‌. इंदापूर येथून दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

इंदापूर तालुक्यातील दौरा आटोपून दुपारी नातेपुते, ता. माळशिरस येथील शेंडगे कापड दुकानात सदिच्छा भेट, त्यानंतर माळशिरस येथील भाग्यलक्ष्मी अर्बन वुमन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या नवीन पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी माळशिरस येथून भरणेवाडी, ता‌. इंदापूर येथे मुक्कामी जाणार आहेत…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button