……. अखेर माळशिरस नगरपंचायत हद्दीतील लिंगायत दफन भूमीचा प्रश्न मिटला, लिंगायत समाजाला आनंद वाटला…

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न.
मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, मा. आमदार राम सातपुते त्यांचे सहकार्य तर मा. नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख यांचा सततचा पाठपुरावा
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजना अंतर्गत माळशिरस मधील अकलूज रोडजवळ लिंगायत दफन भूमी विकसित करणे 20 लाख रुपये विकास कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी मा. नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, आबासो धाईंजे, वैभव जानकर, कैलास वामन, महादेव कोळेकर, रणजीत ओव्हाळ, प्रवीण केमकर, आजीनाथ वळकुंदे, दादासाहेब शिंदे, रावसाहेब देशमुख, वरूण धाईंजे, महादेव माने, चंद्रकांत राजमाने, शिवदास गुजरे, रविराज वाणी, नागेश होनराव, शितल गुजरे, गणेश गुजरे, भारत गाताडे, बबन शेटे, संजय चिंचकर, प्रमोद राजमाने, योगेश पुराणिक आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

माढा लोकसभेचे कार्यकर व पाणीदार मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सहकार्यातून तर माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांचा सततचा पाठपुरावा यामुळे लिंगायत दफन भूमीच्या विकसित विकासकामाचा भूमिपूजन संपन्न झालेला आहे.

माळशिरस नगरपंचायत हद्दीतील वीरशैव लिंगायत समाजाची अनेक वर्षांपासून मागणी होती, माळशिरस नगरपंचायत हद्दीत दफन भूमी व्हावी. सोलापूर जिल्ह्याचे लिंगायत समाजाचे पालकमंत्री दिलीप सोपल व विजय मालक देशमुख होऊन सुद्धा दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर होता.


रणजीतदादा, जयाभाऊ, रामभाऊ या त्रिमूर्तींनी लिंगायत दफनभूमीचा प्रश्न माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यातून प्रश्न मिटला, त्यामुळे लिंगायत समाजाला आनंद वाटला. लिंगायत समाज बांधवांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



